व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी लोकल प्रवास करून साधला प्रवाशांशी संवाद

लोकल प्रवाशांच्या सर्व समस्या सोडविण्यास बांधील : बापूसाहेब भेगडे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 18, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी लोकल प्रवास करून साधला प्रवाशांशी संवाद

Dainik maval news : अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी लोणावळा ते आकुर्डी आणि आकुर्डी ते तळेगाव स्टेशन असा लोकल प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी प्रवाशांनी आपल्या समस्या मांडत त्या सोडविण्यासाठी तुम्ही आमदार व्हायलाच हवे. त्यासाठी आम्ही सर्व नोकरदार, व्यावसायिक, महिला, तरुण वर्ग आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास दिला.

बापूसाहेब भेगडे यांनी सर्वांच्या मागण्या ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचा विश्वास दिला. लोकल प्रवाशांनी सांगितले, की आम्ही कामावर सकाळी जातो आणि सायंकाळी घरी येतो. त्यामुळे आमच्या समस्या, मागण्या कुणाकडे मांडायच्या हे कळत नव्हते. बरे झाले तुम्ही स्वतःहून आमच्याकडे आलात. आमच्याकडे लक्ष देणारे कुणीतरी आहे, हे पाहून छान वाटले. आमच्या सर्व मागण्या तुम्ही आमदार झाल्यावर पूर्ण होतील, असा विश्वास वाटतो. आमचं मत आपल्यालाच आहे, असे आश्वासनही यावेळी प्रवाशांनी दिले.

बापूसाहेब भेगडे यांनी यावेळी प्रवाशांना आश्वासन दिले, की लोणावळा ते पुणे स्टेशन दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा 100 टक्के प्रयत्न करणार आहे. रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन यासंदर्भात केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडविणार आहे. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्यांना तळेगावमध्ये थांबा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यात कायमस्वरूपी महिला सुरक्षारक्षक असावेत, यासाठी रेल्वे पोलिसांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविणार आहे.


dainik maval jahirat

Previous Post

दादा.. तुम्ही इतर मतदारसंघात लक्ष द्या, मावळची जनता माझ्याच सोबत ! आमदार शेळकेंनी एकट्यानेच लढवला किल्ला

Next Post

मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन

मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.