रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. देशभरात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे. आता या मोफत रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने महत्त्वाची अपडेट दिली आहे. ( UIDAI Says Now Card Holder Get Ration Through Aadhar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यूआयडीएआय कडून देशभर आधार कार्ड वाटप करण्याचे काम केले जाते. मात्र आता देशात कुठेही आधारद्वारे रेशन घेता येणार आहे, अशी माहिती यूआयडीएआयने दिली आहे. यूआयडीएआयने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.
यूआयडीएआयच्या या निर्णयामुळे आता देशात कुठेही रेशन सुविधा आधारद्वारे उपलब्ध होणार आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधार अपडेट असणे आवश्यक आहे. या सुविधेचा लाभ आधारकार्ड अपडेट नसलेल्या व्यक्तींना घेता येणार नाही. या व्यतिरिक्त रेशन कार्ड संदर्भात काही तक्रार असल्यास 1947 या क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो.
#UpdatedAadhaarPowerfulAadhaar
Rations may be taken across the country with the help of #Aadhaar under "One Nation, One Ration Card" program.
Update your #Aadhaar by visiting Aadhaar centres near you.
To locate Aadhaar centres near you, Click here- https://t.co/TM0HQAFteK pic.twitter.com/BPdubWnxnZ— Aadhaar (@UIDAI) October 24, 2022
यासह सरकारने अंत्योदय रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर कार्डधारकांना 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळणार आहे. ( UIDAI Says Now Card Holder Get Ration Through Aadhar )
अधिक वाचा –
– कुटुंबातील कुणी कर्जदार व्यक्ती कोरोनाने गेला असल्यास ही बातमी नक्की वाचा, सहकार विभागाचा दिलासादायक निर्णय
– मोठी बातमी! मावळ तालुक्यात विविध महाविद्यालयांमध्ये नव मतदारांसाठी मेगा कॅम्प, जाणून घ्या कधी आणि कुठे?