Dainik Maval News : परभणी येथे झालेल्या भारतीय संविधानाचा अवमान, भीमसैनिक महिलांना मारहाण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी सोमवारी (दि.१६) वंचित बहुजन युवा आघाडी लोणावळा शहराच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 11 वाजता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, युवा तालुकाध्यक्ष संदीप कदम, लोणावळा शहर युवा अध्यक्ष करण भालेराव यांनी आपल्या भाषणातून या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक जगताप यांना निवेदन देण्यात आले. शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या मृत्यू प्रकरणी शोक आणि रोष व्यक्त करण्यात आला. यासह दोषींवर कठोर कारवाई करत न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात नागरिकांसह भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संविधानावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी, अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा, आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच ‘जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील. न्याय न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू,’ असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी
– जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन । Zakir Hussain Passes Away
– वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे नव्या वास्तूत स्थलांतर ! तब्बल 135 वर्षे सुरू होते जुन्या इमारतीमध्ये कामकाज
– महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस