राज्याच्या सहकार विभागाने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यात कोविडच्या लाटेत अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे कोरोनाने निधन झाले. काहीवेळा कर्जदार असलेल्या कर्त्या व्यक्तीच्या निधनाने कुटुंबावर बेघर होण्याचीही वेळ आली आहे. अशा सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. ( Maharashtra State Cooperative Department Appeal to collect information of dead borrowers due to Corona )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे सहकार आयुक्त आणि निबंधक अनिल कवडे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोरोना संक्रमणाच्या कालावधीतील कोविड-19 मुळे निधन झालेल्या व्यक्ती, ज्यांचे कर्ज हे मालमत्ता तारण स्वरुपाचे होते, अशा सर्वांची माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच नागरिकांनाही तसे आवाहन केले आहे.
संबंधित विभागातील किंवा जिल्ह्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्थामधील जे कुणी थकीत कर्जदार कोरोनात मयत असतील त्यांची माहिती लवकरात लवकर कार्यालयाला कळवण्याचे किंवा comm.urban@gmail.com या संकेत स्थळावर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकार याद्वारे संबंधित कर्जदारांचे तारण कर्ज माफ करुन कुटुंबीयांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा –
– Video : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांना मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब, ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सुवर्णपदक
– महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार..! उकसान येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न