व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार..! उकसान येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न

जल जीवन मिशन योजना ( Jal Jeevan Mission Scheme ) अंतर्गत उकसान ( Uksan Village ) नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 98 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 22, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Uksan-Village-Maval-Taluka

Photo : fb / sunil shelke


मावळ तालुक्यातील उकसान येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने सुमारे 98 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या योजनेचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी (दिनांक 22 नोव्हेंबर) महिला भगिनींच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. ( Tap Water Supply Scheme In Uksan Village Maval Taluka Under Jal Jeevan Mission Scheme )

जल जीवन मिशन योजना अंतर्गत उकसान नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 98 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, गावासह दोन्ही पठारावरील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट यामुळे साध्य होणार आहे. या निधीतून शेडगे वस्ती येथे दहा हजार लिटर क्षमतेची व आखाडे वस्ती येथे दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि सुमारे 12 किलोमीटर लांबीची पाणी वितरण व्यवस्थेची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

उकसान येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.'जल जीवन मिशन' अंतर्गत या पाणी पुरवठा योजनेसाठी९८लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे.या समारंभास जेष्ठ मान्यवर,आजी-माजी सरपंच,सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. pic.twitter.com/YQz5jGRSLF

— Sunil Shelke (@shelkesunilanna) November 22, 2022

वडिवळे प्रकल्पाच्या जवळ असलेल्या डोंगरावरील उकसान पठारावर लोकवस्ती असून याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी पाणी पुरवठ्याची सोय नसल्याने येथील नागरिकांना विहिरी व डबक्यातील दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत होते. तसेच यासाठी देखील त्यांना प्रचंड पायपीट करावी लागत होती. या समस्येची आमदार सुनिल शेळके यांनी दखल घेत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून उकसान गाव व पठारावरील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेमुळे येथील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, पीएमआरडीए सदस्य दिपाली हुलावळे, संगिता शेळके, शशिकला सातकर, करंजगाव सरपंच दिपाली साबळे, उकसान सरपंच शामल इंगवले, उपसरपंच अमोल शिंदे, सदस्य आशा बांदल,आशा मोरमारे, सारिका कोंढरे,सिता शिंदे, निशा कोंढरे, पोलीस पाटील सुषमा शिंदे,साईनाथ गायकवाड, कैलास गायकवाड,दत्तात्रय पडवळ, बाबाजी गायकवाड,भाऊसाहेब मोरमारे, अमोल कोंडे, माजी सरपंच संतोष कोंढरे,सोमनाथ शिंदे,सुभाष शिंदे, बाळासाहेब शिंदे, गुलाब कोंढरे आदि.उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष नितीन शेलार यांनी तर माजी उपसरपंच सोमनाथ शिंदे यांनी आभार मानले.

अधिक वाचा –

– तळेगाव दाभाडे । हातचलाखीने एटीएम काढून घेत वयोवृद्ध व्यक्तीची 85 हजारांची फसवणूक
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम, थकबाकीदारांना जप्तीचे वॉरंट


dainik maval jahirat

Previous Post

Video : सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांना मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताब, ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये सुवर्णपदक

Next Post

लव्ह मॅरेजनंतरही दुसरीवर जीव जडला, दुसऱ्यांदा लव्ह मॅरेज करण्यासाठी पत्नीसोबत केले भयानक कृत्य

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mulshi-Crime

लव्ह मॅरेजनंतरही दुसरीवर जीव जडला, दुसऱ्यांदा लव्ह मॅरेज करण्यासाठी पत्नीसोबत केले भयानक कृत्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 5, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.