महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ( Minister Gulabrao Patil ) यांनी मावळ लोकसभा ( Maval Loksabha ) मतदारसंघातील मावळ विधानसभा ( Maval Vidhansabha ) , कर्जत-खालापूर आणि उरण विधानसभा मतदार संघातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. या बैठकीला मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne ) , मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खासदार श्रीरंग बारणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेण्याची मागणी केली होती. मावळ लोकसभा मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजने अंतर्गत विविध योजना सुरु आहे. खास करुन मावळ तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून आणि आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून अनेक गावात नळ पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु आहेत, तर काही ठिकाणी पुर्णत्वास गेली आहेत.
अशा सर्व कामांबाबतची ही आढावा बैठक घेण्यात आली. मंत्री गुलाबराव पाटील, खासदार बारणे, आमदार शेळेक यांसह प्रधान सचिव पाणी पुरवठा आणि संबंधित विभागाचे आधिकारी उपस्थित होते. ( Minister Gulabrao Patil Reviewed Water Supply Schemes Of Maval Constituency In Presence Of MP Shrirang Barne MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
मावळकरांची उपचारासाठीची धावाधाव कमी होणार; कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरु
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मावळात भाजपचा पहिला सरपंच ! Maval Politics