लोणावळा ( Lonavla ) येथील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) निष्ठावंत कार्यकर्ते महेश गोपाळ केदारी ( Mahesh Kedari ) यांची महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या ( Maharashtra Transport Sena ) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार (दिनांक 10 ऑक्टोबर) रोजी त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. ( Mahesh Kedari Appointed Maharashtra Transport Sena West Maharashtra President )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या सर्व जिल्ह्यांचा भार आता त्यांच्याकडे असणार आहे. या सहाही जिल्ह्यांतील वाहतूकदारांशी संपर्क साधून संबंधित शिवसेना ( Shiv Sena ) पदाधिकारी खासदार, आमदार यांच्याशी सल्लामसलत करुन संघटना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी ( Uday Dalvi ) यांच्या हस्ते महेश केदारी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. महेश केदारी हे मागील अनेक वर्षांपासून वाहतूक सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी कार्यरत होते. त्यांचे काम पाहूनच पक्षाने त्यांना ही नवी जबाबदारी दिली आहे.
अधिक वाचा –
मावळचे खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत मंत्री गुलाबराव पाटलांनी घेतला मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मावळात भाजपचा पहिला सरपंच ! Maval Politics
https://youtube.com/shorts/1rZFjT0aLc4?feature=share