माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ( Bala Bhegade ) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे ( Ravindra Bhegade ) यांच्या नेतृत्वात झालेल्या चिखलसे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत भाजपने बाजी मारली आहे.
महाराष्ट्रात भाजपा शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मावळ तालुक्यात राजकीय सत्तांतर होण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी चिखलसे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून असताना मावळ भाजपचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी राजकीय डावपेच आखत चिखलसे ग्रामपंचायतीवर सचिन मधुकर काजळे यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला. ( Bharatiya Janata Party Sarpanch in Chikhalse Gram Panchayat Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य संपर्कात असून येणाऱ्या काळात अनेक ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आल्याचे चित्र पहावयास मिळेल असा विश्वास यावेळी रविंद्र भेगडे यांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सचिन काजळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मा नगरसेवक अमोल शेटे, युवा नेते बंटी भेगडे, संदीप भेगडे, राहुल घाग, सचिन भेगडे यांच्यासह चिखलसे आणि अहिरवडे येथील युवा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
मावळकरांची उपचारासाठीची धावाधाव कमी होणार; कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरु
मुलायमसिंह गेले…पण फक्त राजकीय वारसाच नाही तर खुप मोठी संपत्तीही सोडून गेले! पाहा नेताजींकडे किती होती संपत्ती