मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) नागरिकांच्या आरोग्याच्या विविध समस्या सोडवता याव्यात, विविध आजारांवरील योग्य उपचार, योग्य किमतीत त्यांना घेता यावेत, यासह उपचारांसाठी मावळकरांची होणारी धावाधाव कमी व्हावी, यासाठी कान्हे ( Kanhe ) येथे उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाविकास आघाडी सरकार काळात या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला मंजूरी मिळाली असून आमदार सुनिल शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून हे उपजिल्हा रुग्णालय उभे राहत आहे.
वडगाव मावळ ( कान्हे ) येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आणि 20 खाटांचे हे ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येत आहे. या कामासाठी 29,22,48,091 रुपयांची निविदा रक्कम मंजूर असून 18 महिन्यात हे रुग्णालय पुर्णत्वास जाईल. ( Construction Of Sub District Hospital At Kanhe Maval Taluka )
अधिक वाचा –
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाआरोग्य शिबिर’, पाहा कधी आणि कुठे आहे शिबिर I MLA Sunil Shelke Birthday
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तात्काळ घ्या, पाहा कुणी केलीये मागणी