समाजवादी पार्टीचे संस्थापक, सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव ( mulayam singh yadav ) यांचे सोमवारी (10 ऑक्टोबर 2022) रोजी दुःखद निधन झाले. देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवून हा राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला. मुलायमसिंह यादव यांनी सहकाऱ्यांसोबत 1992 साली समाजवादी पार्टीची स्थापना केली. त्याअगोदर आणि नंतर मिळून मुलायमसिंह यांनी तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद भुषवले.
देशाच्या राजकारणात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या युपीच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड राहिल्याने राष्ट्रीय राजकारणातही त्यांनी चांगलाच ठसा उमटवला. नेताजी नावाने उत्तर प्रदेशच्या जनसामान्यांत परिचित असणारे मुलायमसिंह हे त्यांच्या पाठीमागे खुप मोठा राजकीय वारसा सोडून गेलेत. त्यांचे पुत्र अखिलेश यादव हे देखील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेत. तसेच आताही राजकारणात केंद्रस्थानी आहे. मात्र, मुलायमसिंह यादव हे फक्त राजकीय वारसाच पाठीमागे सोडून गेलेत असे नाही, तर खूप मोठी संपत्ती देखील पाठीमागे सोडून गेले आहे. ( mulayam singh yadav property )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोट्यधीश होते मुलायमसिंहजी….
प्राप्त माहितीनुसार मुलायसिंह यादव हे त्यांच्या पुढील पिढीसाठी सुमारे 16.52 कोटींची संपत्ती सोडून गेलेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुलायम सिंह यादव यांची एकूण संपत्ती 16,52,44,300 रुपये होती. या स्थावर मालमत्तेचा खुलासा करतानाच मुलायम सिंह आणि त्यांची पत्नी साधना यादव यांचे वार्षिक उत्पन्न 32.02 लाख इतके होते.
मुलायमसिंह यादव यांच्या गाड्या, घरे आणि जमीन…
मुलायम सिंह यांच्याकडे टोयोटा कार होती, जिची किंमत सुमारे 17 लाख रुपये आहे. त्याच्याकडे 50 हजारांहून अधिक किमतीचे एलिमिनेटर वाहन आहे. मुलायम सिंह यांचे लखनऊमध्ये घर आहे, जिथे नेताजी त्यांच्या पत्नी साधनासोबत राहत होते. त्यांचे इटावामध्येही घर आहे. मुलायमसिंह यांच्याकडे कोट्यवधींची कृषी संपत्ती होती. प्राप्त माहितीनुसार मुलायमसिंह यांच्या नावे 7 कोटींपेक्षा जास्त किमतीची शेतजमीन आणि 10 कोटींहून अधिक किमतीची बिगर शेतीची जमीन आहे. ( Mulayam Singh Yadav Net Worth )
मुलाकडून होते कर्जबाजारी !
एवढ्या संपत्तीचे मालक असलेले मुलायमसिंह हे देखील कर्जबाजारी होते, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतू, कोट्यवधींची संपत्ती असूनही मुलायमसिंह यांच्यावर 2,13,80,000 रुपयांचे कर्ज होते आणि हे कर्ज त्यांनी स्वतःचाच मुलगा अखिलेश यादव यांच्याकडून घेतले होते.
अधिक वाचा –