केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि थेट शिवसेना हे नाव वापरण्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला मनाई केल्यानंतर दोन्ही गटांनी पर्यायी नावे आणि चिन्हे यांचे पर्याय सांगायला सांगितले होते. त्यानुसार आधी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि त्यानंतर शिंदे गटाकडून प्रत्येकी तीन नावांचे पर्याय आणि तीन चिन्हांचे पर्याय यांची यादी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली. परंतू, विशेष बाब म्हणजे दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या नावांमध्ये बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख होता, तसेच त्रिशूळ आणि उगवता सुर्य ही चिन्हे समान होती. त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले गेले आहे. तर उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे. तसेच, उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. मात्र, शिंदे गटाला चिन्हासाठी पुन्हा पर्याय द्यायला सांगण्यात आले आहे. ( Election Commission allots party name for Thackeray And Shinde faction )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निवडणूक आयोगाने त्रिशुळ आणि गदा ही दोन्ही चिन्हे नाकारल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही धार्मिक चिन्हे असल्यामुळे नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
Election Commission allots Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray as party name for Thackeray faction
Election Commission allots Balasahebanchi Shiv Sena as party name for Eknath Shinde faction
अधिक वाचा –
तालुक्यातील नेते झोपलेत काय? मुंढावरेत कामगारांचा न्यायासाठी 10 दिवसांपासून अखंड लढा सुरुच! वाचा संपूर्ण प्रकरण?
तिकोना पेठ येथे वंचित बहुजन आघाडीच्या नव्या शाखेचे उद्घाटन I Maval Politics