मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवन मावळ ( Pavan Maval ) भागात असलेल्या किल्ले तिकोनाच्या पायथ्याशी वसलेल्या तिकोना पेठ ( Tikona ) गावात, वंचित बहुजन आघाडी ( Vanchit Bahujan Aghadi ) पक्षाच्या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. रविवारी (9 ऑक्टोबर) रोजी या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वंचित बहुजन आघाडीचे नेते सर्वजीत बनसोड ( Sarvjeet Bansode ) यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी पिंपरीत HA मैदानावर धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्या सोहळ्याच्या अनुषंगाने तयारीबाबत बैठक यावेळी घेण्यात आली. ( Vanchit Bahujan Aghadi Political Party New Branch Tikona Maval Taluka )
अधिक वाचा –
तालुक्यातील नेते झोपलेत काय? मुंढावरेत कामगारांचा न्यायासाठी 10 दिवसांपासून अखंड लढा सुरुच! वाचा संपूर्ण प्रकरण?
‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’, भक्तीमय वातावरणात मावळमध्ये काकड आरती उत्सव सुरू