मावळ तालुक्यातील मुंढावरे गाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. याचे कारण या गावाच्या हद्दीत असलेल्या वेट अँड जॉय वॉटर पार्क कंपनी बाहेर मागील दहा दिवसांपासून सुरु असलेले कामगारांचे ठिय्या आंदोलन. वेट अँड जॉय कंपनी प्रशासनाने तुघलकी निर्णय घेत स्थानिक भुमिपुत्रांना कामावरुन कमी केले. या अन्यायाच्या विरोधात ते सर्व कामगार मागील दहा दिवसांपासून लढा देत आहेत, उपोषण करत आहेत. ( Wet N Joy Waterpark Mundhaware Workers Agitation Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खरे पाहता मावळ तालुक्यातील कामगार मागील दहा दिवसांपासून त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढा देत असताना तालुक्यातील पक्षीय नेते मंडळी किंवा कार्यकर्ते ठोस निर्णय व्हावा, यासाठी काही करताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी भाजपाने आंदोलन केले. आमदार शेळके यांनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले, तसेच अनेक पक्ष, संघटना, नेते आंदोलन ठिकाणी जाऊन कामगारांशी बोलत, त्यांना समर्थन देत आहे. परंतू, दुसरीकडे आता दहा दिवस झाले तरी कामगारांचा प्रश्न मात्र ठोसपणे मार्गी लागत नाहीये, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळेच तालुक्यातील नेते, राजकीय पक्ष झोपलेत की काय? असा प्रश्न विचारला जातो आहे.
हेही वाचा – महायुतीचा बेधडक मोर्चा : ‘आम्ही कालही कामगारांसोबत होतो, आजही आहोत आणि उद्याही असू’ – रविंद्र भेगडे
या प्रश्नाकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. प्रश्न फक्त 22 कामगारांचा नसून कंपनी प्रशासनाच्या मुजोरीचा देखील आहे, असे कामगार सांगत आहेत. त्यामुळे या युवकांच्या न्याय हक्कासाठी सर्व पक्षियांनी एकजूट होणे आता गरजेचे बनले आहे.
अधिक वाचा –
युवासेनेकडून पदाधिकारी मुलाखत, मावळ विधानसभेसाठी लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता
शिवसेना भवनातून नवा आदेश..! शिवसेना मावळ तालुका प्रमुख पदी ‘यांची’ नियुक्ती, तर उपजिल्हाप्रमुख पदीही नवा चेहरा