मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील वराळे गावात लोकसहभागातून सुलभ शौचालये उभारली जाणार आहेत. रविवारी गावातीलच महिला भगिनींच्या हस्ते या कामांचे भुमिपूजन करण्यात आले. ( Toilet Will Built Through Labor Donation In Varale Village Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसहभागातून वराळे गावातील आदिवासी, कातकरी, ठाकर, वडार समाज बांधवांसाठी बांधले जाणाऱ्या सुलभ शौचालयाचा भूमिपूजन समारंभ स्थानिक समाजातील महिलांच्या हस्ते पार पडला.
यावेळी माजी सरपंच विश्वनाथ मराठे, माजी उपसरपंच बाळासाहेब दशरथ मराठे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी शंकर मराठे, ज्येष्ठ नागरिक काळुराम घोंगे, उद्योजक बाळासाहेब मराठे पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ मराठे पाटील, निलेश मराठे, निलेश दत्तू मराठे, गणेश मच्छिंद्र मराठे, विकास सुदाम मराठे, रामदास मांडेकर, विवेक शिंदे, अतुल शिवाजी मराठे, अमर मराठे पाटील, सचिन चिलाजी मराठे, सुदर्शन तरूण मंडळांचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
उद्धव ठाकरेंचा घणाघात! ‘मी डगमगणार नाही’, ’40 तोंडाच्या रावणामुळे हे झालं’, ‘निवडणूक आयोगाकडे मागणी’, वाचा संपूर्ण भाषण
युवासेनेकडून पदाधिकारी मुलाखत, मावळ विधानसभेसाठी लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता