राज्यात सध्या शिवसेना तीव्र राजकीय संघर्ष काळातून जाताना दिसत आहे. अशात शिवसेनेचीच शाखा असलेल्या युवासेनेचीही शकले होताना दिसत आहे. मात्र, मावळ तालुक्यात शिवसेनेच्या युवासेनेची ताकद चांगलीच बळावत आहे. किंबहूना अधिक जोशात युवासेना भरारी घेताना दिसत आहे.
त्यातच आता युवासेनेकडून पदाधिकारी मुलाखती सुरु झाल्यात. त्यामुळे लवकरच मावळ विधानसभेत युवासेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ( Shiv Sena Yuva Sena Maval Assembly Yuva Incumbent Interviews )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
युवासेना कार्यकारीणी सदस्य अंकित प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ विधानसभेतील युवकांची पदाधिकारी मुलाखत घेण्यात आली. याप्रसंगी युवासेना सहसचिव समृद्ध शिर्के, सिद्धेश पाटेकर तसेच पिंपरी चिंचवड आणि मावळ विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेचे मावळ जिल्हाअधिकारी अनिकेत घुले हेही उपस्थित होते.
अधिक वाचा –
उद्धव ठाकरेंचा घणाघात! ‘मी डगमगणार नाही’, ’40 तोंडाच्या रावणामुळे हे झालं’, ‘निवडणूक आयोगाकडे मागणी’, वाचा संपूर्ण भाषण
मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विश्वनाथराव दाभाडे काळाच्या पडद्याआड