तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट विश्वनाथ जयवंतराव दाभाडे यांचे शनिवारी रात्री उशीरा निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 69 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, चार भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे. ( Vishwanathrao Dabhade Passed Away )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अॅडव्होकेट दाभाडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी सन 1987 ते 1989 या कालावधीत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद भूषवले होते. तसेच, 1985 ते 1996 या दोन पंचवार्षिक कालावधीत ते तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते.
भारतीय जनता पार्टी पक्षाचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांनी जिल्ह्यात काम केले होते. पुणे जिल्हा भाजपाचे ते माजी सरचिटणीस होते. त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली असल्याची श्रद्धांजली अनेक पदाधिकाऱ्यांनी वाहिली आहे. ( Former Mayor of Talegaon Dabhade Municipal Council Vishwanathrao Dabhade Passed Away )
अधिक वाचा –
शाब्बास पोरी..! हर्षदाची पुन्हा एकदा ‘गरूड’ भरारी, मावळ कन्येचे कांस्य यश, वाचा सविस्तर I Harshada Garud
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या महिलेची भुशी येथील वडिलोपार्जित जमीन लाटण्याचा प्रयत्न, प्रकरण समोर येताच खळबळ