इंग्लंड ( England ) येथे राहत असलेल्या महिलेच्या बनावट सह्या करत तिची वडिलोपार्जित जमीन लाटण्याचा प्रयत्न ( Grabbing ancestral land ) केल्याप्रकरणी 3 वकिलांसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात एका वकिलासह पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बबन लक्ष्मण फाटक, दत्तात्रेय लक्ष्मण फाटक, अमित अशोक फाटक आणि अभिजित अशोक फाटक (सर्वजण राहणार भुशी, ता. मावळ) आणि वकील विकास पंढरीनाथ थोरात (राहणार नाशिक) अशी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यांची नावे आहेत. तसेच या प्रकरणी आणखीन दोघांविरोधात गुन्हा दाखल असून न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ( An Attempt To Grab Land at Bhushi In Maval Taluka of Woman Who Living In England )
संपूर्ण प्रकरण काय?
इंग्लंडस्थित एका ज्येष्ठ नागरिक महिलेने याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादींची मावळ तालुक्यातील भुशी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. आरोपिंनी जानेवारी 2020 ते जानेवारी 2022 या दरम्यान फिर्यादींच्या नावे असलेल्या मिळकतीवर कुळ लावण्याकरिता तहसीलदार मावळ यांचे न्यायालयात कुळकायदा अंतर्गत दावा दाखल केला.
तसेच फिर्यादी या ज्या ठिकाणी राहायला नाहीत, त्या पत्त्यावर नोटीस काढल्या. फिर्यादी या दाव्यासाठी हजर राहत नाहीत, असे दाखवल्याने मार्च 2021 मध्ये निकाल आरोपींच्या बाजूने लागला. त्यानंतर फिर्यादी या इंग्लंडमध्ये राहत असतानाही कुळकायद्यान्वये स्वत:ची नावे लावून घेतली, असे फिर्यादीत नमूद आहे. या गुन्ह्यात 5 आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याला सहायक सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. ( An Attempt To Grab Land at Bhushi In Maval Taluka of Woman Who Living In England )
अधिक वाचा –
संमतीशिवाय पत्नीचा गर्भपात, नवऱ्यासह डॉक्टरवर गुन्हा, ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकार उघडकीस
देहुरोडमध्ये ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मारण्याचा कट’ ? एका फोनने खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण