‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात आहे. बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया एका फ्लॅटमध्ये सुरु आहे.’ पोलिसांना आलेला हा एक फोन आणि त्यानंतर माजलेली खळबळ याने शुक्रवारचा (7 ऑक्टोबर) संपूर्ण दिवस गाजवला.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याचा प्लॅन आखला जात आहे, असा एक फोन पोलिसांना आला होता आणि संपूर्ण राज्यात खळबळ माजली. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयास करुन प्रकरणाचा, त्या फोनचा छडा लावला तेव्हा सर्वजण थक्क झाले. लोणावळा जवळ एका हॉटेलमालकाने पाण्याच्या बाटलीचे 5 रुपये अधिक घेतल्याने संबंधित व्यक्तीने पोलिसांना हा फोन केल्याचे तपासात समोर आले. मात्र, पोलिसांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शुक्रवारी (7 ऑक्टोबर) रोजीही पोलिसांना 112 या क्रमांकावर फोन आला. ज्यात एका व्यक्तीने, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात आहे. तसेच मुंबईत आणि रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार आहे. त्यासाठी एका फ्लॅटमध्ये बॉम्ब बनवला जात आहे’, अशी खोटी माहिती दिली. पोलिसांनी मात्र तत्परतेने या प्रकरणाच तपास केला. तेव्हा, हा फेक कॉल होता असेल पोलिसांना समजले. तसेच, चौकशीनंतर हा खोटा फोन वसाहतीमधल्या लोकांच्या आवाजाला कंटाळून मनोज अशोक हसे या व्यक्तीने केला होता, हे स्पष्ट झाले. पोलिसांना मात्र पुन्हा एकदा अशा गोष्टीमुळे नाहक त्रास सहन करावा लागला. ( Pimpri Chinchwad Police Arrest Computer Engineer Who Fake Threatened To Kill Prime Minister Narendra Modi )
नवीन विकृती वाढतेय…?
आधी लोणावळा आणि आता देहूरोड येथील या घटना पाहिल्यानंतर एक नवी विकृती जन्म घेत आहे का? असे वाटू लागले आहे. एका शुल्लक शुल्लक गोष्टींसाठी किंवा कुणाला त्रास द्यावा यासाठी म्हणून पोलिसांनाच अगोदर अडचणीत टाकायचे, कोड्यात टाकायचे, त्यातून प्रशासनाची धावाधाव होणार, यातून नेमके काय साध्य होते, कोणता आनंद मिळतो, कोणते समाधान प्राप्त होते, हे समजायला मार्ग नाही. मात्र, ही विकृती जागेवरच ठेचणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अधिक व्यापाने दमलेल्या पोलिस प्रशासनाला दिवसातून एखादा घासही गिळणे शक्य होणार नाही. ( Pimpri Chinchwad Police Arrest Computer Engineer Who Fake Threatened To Kill Prime Minister Narendra Modi )
अधिक वाचा –
आख्ख्या महाराष्ट्राला ठाकरे-शिंदेंची चिंता, पण इकडे तर ठाकरे-शिंदे घरी लगीनघाई सुरु, विश्वास नसेल तर लग्नपत्रिका पाहा
पत्नीच्या वाढदिवसाला बाळा भेगडे यांची भावूक पोस्ट; म्हणाले, ‘तिने ना कधी खंत व्यक्त केली ना कधी खेद!’ वाचा संपूर्ण पोस्ट
भयानक! अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाचा दारू पाजून अत्या’चार, वरसोली गावातील संतापजनक प्रकार