मावळ तालुक्याचे ( Maval Taluka ) माजी आमदार ( Former MLA ) आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ( Bala Bhegade ) यांच्या पत्नी सारीका भेगडे ( Sarika Bhegade ) यांचा आज (7 ऑक्टोबर) रोजी वाढदिवस. बाळा भेगडे यांच्या प्रमाणेच समाजकार्यात क्रियाशील असलेल्या सारीका भेगडे यांना पती बाळा भेगडे यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Wishes Happy Birthday ) दिल्या आहेत. त्यांची हि पोस्ट म्हणजे एका व्यस्त राजकारण्याने पत्नीसाठी दिलेले शब्दांचे अनमोल गिफ्ट आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणालेत बाळा भेगडे? वाचा संपूर्ण पोस्ट जशीच्या तशी…
“माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि अतूट क्षणांच्या आठवणींची साथीदार असणारी माझी पत्नी सारीका हीचा आज वाढदिवस! यानिमित्त सारीकाला आभाळभर शुभेच्छा! तिच्या चेहऱ्यावर नेहमी आनंदाचं चांदणं नांदावं आणि समाधानाची प्रभात व्हावी,ही ईश्वरचरणी प्रार्थना!
राजकीय जीवनात कार्यरत असताना माझ्यासारख्या व्यक्तीला वेळेची मोठी कसरत करावी लागते. कोणत्याही पतीचा वेळ हा पत्नीचा हक्काचा असतो, परंतु समाजासाठी काम करताना या वेळेच्या बाबतीत मोठी तडजोड करावी लागत असूनही तिने ना कधी खंत व्यक्त केली ना कधी खेद! हा तिचा मोठेपणा मला प्रचंड भावतो.
वडीलधाऱ्यांची शिकवण आणि संस्कार ही तिच्याकडील मोठी संपत्ती असून ती कधीही न आटणारी आहे. याच संपत्तीच्या बळावर संसारवेलीवरील फुलांना जपतानाच आणि घरातील प्रत्येकाचा मानसन्मान राखत,त्यांच्या आवडी-निवडी जपत तिच्या प्रत्येक दिवसाची सुरवात तेवढ्याच प्रसन्नतेने होते. हीच प्रसन्नता तिच्या आयुष्यात कायम रहावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
– संजय (बाळा) विश्वनाथराव भेगडे”
बाळा भेगडे हे मावळ तालुका, पुणे जिल्हा येथील भाजपाचे मुख्य नेतृत्व तर आहेतच, परंतू आता राज्य आणि देश स्तरावरील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत. अशात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेळ देता येणे थोडे अवघड जाते. परंतू, पत्नीच्या जन्मदिनी त्यांनी केलेली ही पोस्ट अनेकांना भावूक करत आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांनी पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ( Former MLA Maval Taluka Bala Bhegade Wishes Happy Birthday To His Wife Sarika Bhegade on Social Media )
अधिक वाचा –
तळेगाव दाभाडे येथे स्वच्छता अभियान, माजी मंत्री बाळा भेगडे यांचा सहभाग I Talegaon Dabhade
बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! थेट गुजरात राज्यात करतायेत ‘हे’ खास काम