कार्ला गावातील ( Karla ) युवा नेते भावेश राजू हुलावळे ( Bhavesh Hulawle ) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ( NCP ) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्ला गाव अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भावेश हुलावळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रियाशील सदस्य असून त्यांची सामाजिक बांधिलकी पाहता आणि आतापर्यंत त्यांनी केलेल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्याची प्रामाणिकपणे नोंद घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवली आहे. ( Bhavesh Hulawle Appointed Nationalist Student Congress Karla Village President )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे पुरोगामी विचार आणि कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचीस जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यासह सध्याचे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे, मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
अधिक वाचा –
भयानक! अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाचा दारू पाजून अत्या’चार, वरसोली गावातील संतापजनक प्रकार
पिंपळखुटे नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते संपन्न I Jal Jeevan Mission