Dainik Maval News : धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी यासाठी रेशन दुकानात इ-पाॅस मशीन बसविण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना मशीनवर ‘अंगठा’ दाखवून ओळख पटविल्यानंतरच धान्य दिले जाते. मावळात ग्रामीण भागात आधी या यंत्राला कनेक्टिव्हिटीची समस्या सतावत होती. त्यानंतर आता सर्व्हरच्या अडचणीमुळे इ-पाॅस मशीन काम करीत नाही. मशीन मधल्या बिघाडामुळे खेडोपाडी लाभार्थ्यांना तासनतास रेशन दुकानात बसून राहावे लागत आहे.
संपूर्ण राज्यात इ-पाॅस मशीनच्या तक्रारी वाढल्या असल्याने धान्य वितरण व्यवस्था जवळपास ठप्प झाली आहे. डिसेंबर महिन्याची एकोणाविस तारीख उलटली तरीही रेशनधारकांना अद्याप धान्य मिळालेले नाही. धान्य घेण्यासाठी लाभार्थी रेशन दुकानात येतात, परंतु मशीन काम करत नसल्याने धान्य वाटप होत नाही. याचा रोष रेशन वितरकांना सहन करावा लागत आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच धान्य वितरण केवळ मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाले आहे. धान्य दुकानात असूनही दुकानदारांना त्याचे वितरण करता येईना, दुसरीकडे धान्य घेण्याकरीता लाभार्थी आपला कामधंदा सोडून दुकानात हेलपाटे घालत आहेत. बिघाड झालेले इ-पॉस मशीन केव्हा दुरुस्त होईल हे दुकानदारांनाही सांगता येत नसल्यामुळे कार्डधारक व दुकानदार यांच्यात किरकोळ वाद होत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार ! कुरवंडे येथील 42 शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप । Maval News
– अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, पिंपळोली गावच्या हद्दीतील घटना । Maval News
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
– कुसवलीतील सहारा वृद्धाश्रमात रंगली अनुभवाच्या कवितांची व मुक्त संवादाची मैफल । Maval News