Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सर्वच विभागातील भात कापणी आता पूर्ण झाली असून शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणीच्या आणि उगवलेल्या पिकांच्या मशागतीत मग्न आहेत. तर काही शेतकरी भात कापणीनंतर हाताशी आलेल्या भाताला भरडून नवा तांदुळ काढून घेण्यासाठी राइस मिलवर भात घेऊन येत आहेत.
प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या राइस मिलच्या ठिकाणी भाताच्या पोती भरलेल्या गोणींच्या थप्पी दिसून येत आहे. रब्बी पिकांची कामे करता करता नवा तांदुळ घेऊन बाजारात विक्रीसाठी शेतकरी तयारीत आहे. मावळ तालुक्यात पूर्वी भात गिरण्यांची संख्या कमी होती. परंतु सद्यस्थितीत राइस मिलची संख्या मुबलक असल्याने शेतकरी भात भरडण्यासाठी थेट राइस मिलवर भात आणित आहेत.
यंदा मावळ तालुक्यात पर्जन्यमान चांगले राहिले. त्यामुळे भात पिकास पोषक वातावरण निर्माण होऊन भाताचे उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा भाताच्या सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे. यंदा हेक्टरी उत्पादनात वाढ झाली असून नव्या तांदुळाला चांगला भाव मिळेल, अशी सध्या चर्चा आहे.
यंदा फुले समृध्दी वाणास प्रतिकिलो ५० ते ५५ रुपये, रत्नागिरी २४ वाणास प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये, कोलम वाणास प्रतिकिलो ३५ ते ४० रुपये दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर मावळची खास ओळख असलेल्या इंद्रायणी तांदुळाला यंदा विक्रमी ६० ते ७० रुपये प्रतिकिलोचा दर मिळण्याचा अंदाज आहे.
इंद्रायणी तांदूळ ही मावळची खास ओळख आहे. त्यानुसार यंदाही बाजारात मावळचा इंद्रायणी तांदूळ भाव खाण्याची शक्यता आहे. तालुक्यात इंद्रायणीसह तांदुळाच्या अन्य वानांचेही उत्पादन घेतले जाते. त्यात इंद्रायणीला दर्जानुसार प्रतिकिलो सुमारे ६० ते ७० रुपयेचा दर मिळण्याची शक्यता आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार ! कुरवंडे येथील 42 शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप । Maval News
– अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, पिंपळोली गावच्या हद्दीतील घटना । Maval News
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
– कुसवलीतील सहारा वृद्धाश्रमात रंगली अनुभवाच्या कवितांची व मुक्त संवादाची मैफल । Maval News