व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घेणार राज्य सरकारसोबत बैठक ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 20, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


Dainik Maval News : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता गती मिळणार आहे. या मार्गिकेसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे राज्य सरकार सोबत लवकरच संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेत तिसऱ्या आणि चौथा ट्रॅक, लोणावळा आणि कर्जतमधील घाट क्षेत्रात टनेल निर्माण करणे, कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करणे आणि तिला देहूरोड येथे थांबा देणे, पुणे-जोधपूर रेल्वे दररोज सुरू करण्याची आणि चिंचवड स्टेशनवर थांबा देण्याची मागणी केली आहे. त्याला मंत्री वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

खासदार बारणे यांनी गेले काही वर्ष सातत्याने पाठपुरावा करुन पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसर्‍या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. खासदार बारणे म्हणाले,पुणे ते लोणावळा या लोकलमधून दररोज एक लाख नागरिक प्रवास करत आहेत. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील रेल्वे गाड्या दोन ट्रॅकवरून धावत आहेत. या मार्गावर तिसर्‍या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 2017 मध्ये मान्यता दिली आहे. याबाबतचा सर्व्हेही झाला आहे.

ट्रॅक उभारण्यासाठी रेल्वे विभागाकडे जमीनही उपलब्ध आहे. परंतु, सात वर्षे होत आले पण काम सुरू झाले नाही. ट्रॅकचे काम झाल्यानंतर लोकल आणि एक्स्प्रेसही धावतील. त्यामुळे रेल्वेला आर्थिक फायदा होईल. पुणे ते मुंबई असा दररोजचा प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम तत्काळ सुरू करावे. यासंदर्भात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी.

लोणावळा आणि कर्जतमधील घाट क्षेत्रात टनेल निर्माण करा –
पुणे आणि मुंबई दरम्यान दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. त्यात नोकरदार, व्यापारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लोणावळा आणि कर्जत दरम्यान रेल्वे गाडी चालण्यासाठी दोन इंजिनचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे येथे टनेलची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात येथून लांब पल्ल्याच्या, एक्स्प्रेस आणि लोकलही धावू शकतील. त्यामुळे लोणावळा आणि कर्जतमधील घाट क्षेत्राचे सर्वेक्षण करावे. टनेल निर्माण करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.

कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा –
कोरोना काळात बंद केलेल्या अनेक रेल्वे गाड्या पुन्हा सुरू केल्या. परंतु, मुंबई, पुणे अशी कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरु केली नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक्स्प्रेस अतिशय महत्वाची आहे. कोरोनानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी. या एक्स्प्रेसला देहूरोड स्थानक येथे थांबा द्यावा. जेणेकरून या स्थानकावरून हजारो प्रवाशी पुणे, मुंबई प्रवास करतात. त्यांना सुविधा निर्माण होईल, असे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

पुणे-जोधपूर रेल्वे दररोज सुरू करा –
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सद्यस्थितीत दहा लाख लोक राजस्थानशी संबंधित आहेत. या लोकांना व्यवसाय, कौटुंबिक कामासाठी राजस्थानला जावे लागते. परंतु, सध्या या मार्गावर सात दिवसातून एकदा रेल्वे धावत आहे. या रेल्वेला चिंचवडला थांबा देखील नाही. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यापारी, विद्यार्थी, कामगार, पर्यटक यांच्यासाठीही या मार्गावर नियमितपणे रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे-जोधपूर या सात दिवसांनी धावणारी रेल्वे दररोज सुरू करावी. चिंचवड स्टेशनवर थांबा देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार ! कुरवंडे येथील 42 शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप । Maval News
– अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, पिंपळोली गावच्या हद्दीतील घटना । Maval News
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
– कुसवलीतील सहारा वृद्धाश्रमात रंगली अनुभवाच्या कवितांची व मुक्त संवादाची मैफल । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी

Next Post

मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indrayani-Rice

मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.