Dainik Maval News : मावळ तालुक्यातून जाणाऱ्या जुण्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि.20) एकाच दिवशी दोन अपघात झाले. कामशेत व खंडाळा येथे शुक्रवारी (दि. 20) दोन वेगवेगळे अपघात झाले. ज्यात कामशेत येथील अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. तर एक तरुण जखमी झाला आहे. दुसरीकडे खंडाळा येथील अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
कामशेत येथील अपघातात मृणाली दत्तात्रय ठाकूर (वय 20, रा. गोळीबार मैदान, पेण, रायगड) या तरुणीचा मृत्यू झाला असून प्रफुल्ल भाऊ म्हात्रे (वय 28, रा. साई, पेण, रायगड) हा गंभीर जखमी झाला आहे. खंडाळा येथील अपघातात विश्वनाथ हरिचंदर नरसय्या नाईक (वय 52, रा. लोणावळा. मूळ रा. कोंडांगल मंडल आंध्र प्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे.
पहिला अपघात – कामशेत
मृणाली आणि प्रफुल्ल हे दुचाकी (एमएच 46/सीएन 7464) वरून पेण येथून पुण्याकडे येत होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत जवळील नायगाव येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीची एका टँकरला (एमएच 43/वाय 3527) मागून जोरात धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी होऊन मृणालीचा जागीच मृत्यू झाला. तर प्रफुल्ल हा गंभीर जखमी झाला आहे. प्रफुल्ल याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसरा अपघात – खंडाळा
कार्ला येथून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच 04/जेयु 6627) एका हातगाडीला धडक दिली. हातगाडी वरील विक्रेता हातगाडी पासून काही अंतरावर थांबला असल्याने तो सुदैवाने बचावला. त्यानंतर कारने एका दुचाकीला (एमएच 14/एलएन 5074) धडक दिली. दुचाकीस्वार विश्वनाथ नाईक यांचा या अपघातात मृत्यू झाला. नाईक यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर कारने एका विद्युत खांबाला धडक दिली. याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाणे आता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News