Dainik Maval News : मावळ तालुक्यात विशेषतः पूर्वपट्ट्यातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची सर्वाधिक पेरणी केली आहे. त्यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचा समावेश आहे. या पिकांची उगवण देखील अतिशय चांगली झाली असून पिकांचे कीड व रोगराई पासून संरक्षण व्हावे यासाठी कृषी विभाग मावळ यांकडून खास मोहीम राबविण्यात येत आहे.
मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना कीड व रोगराई बाबत सविस्तर माहिती देऊन व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. सध्या आढले बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी सहाय्यक अक्षय ढुमणे ज्वारी व हरभरा या पिकांच्या संरक्षणासाठी फेरोमन ट्रॅप लावण्याबाबत सविस्तर माहिती प्रत्येक शेतकऱ्याला देत आहेत.
ऑक्टोबर महिन्यापासून मावळ तालुक्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. मावळातील पूर्व भागात अनेक गावांत रब्बी पिकांची उगवण अतिशय चांगली झाली आहे. पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी, मार्गदर्शन व जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ महत्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल उभारणे गरजेचे ; आमदार सुनिल शेळके यांची अधिवेशनात मागणी
– मोठी बातमी : पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती । Pune – Lonavala Local
– मावळातील शेतकऱ्यांची भात भरडण्यासाठी लगबग ; इंद्रायणी तांदुळाला सर्वोत्तम दराची अपेक्षा । Maval News