Dainik Maval News : मावळ तालुक्यात नवीन वर्षाची सुरुवात कीर्तन महोत्सवाने होणार आहे. ‘श्री विठ्ठल परिवार मावळ’ या संस्थेच्या वतीने कामशेत येथे एक ते पाच जानेवारी दरम्यान ‘कीर्तन महोत्सव 2025’चे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील हजारो वारकरी बंधू-भगिनींचा सहभाग असणाऱ्या या महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे.
‘श्री विठ्ठल परिवार मावळ’चे संस्थापक आमदार सुनिल शेळके यांनी ही माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व भाविकांनी महोत्सवात सहभागी होऊन कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महोत्सवात दररोज दुपारी तीन ते चार या वेळेत हरिपाठ होणार आहे. दुपारी चार ते सहा दरम्यान विठ्ठल जप, संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान हरी किर्तन व रात्री साडेआठ नंतर महाप्रसाद असणार आहे. महोत्सवाच्या ठिकाणी निवासी व्यवस्था नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.
बुधवार, 1 जानेवारी 2025 रोजी हभप अक्रूर महाराज साखरे यांची कीर्तन सेवा होणार आहे. गुरुवार 2 जानेवारी 2025 रोजी हभप जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन श्रवण करता येईल. 3 जानेवारी 2025 रोजी हभप शिवा महाराज बावसकर यांचे कीर्तन होणार आहे.
शनिवार 4 जानेवारी 2025 रोजी हभप आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशी बाबा) यांची कीर्तन सेवा होईल. शेवटच्या दिवशी म्हणजे 5 जानेवारी 2025 रोजी हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
कीर्तन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी सात ते दहा या वेळात कामशेत बाजार पेठ ते कीर्तन महोत्सव स्थळापर्यंत भव्यदिंडी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार