Dainik Maval News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा वेगाने होणारा विकास पाहून दोन महापालिकांच्या शेजारीच नव्याने दुसऱ्या दोन महिपालिका तयार करण्याच्या चर्चेला आता मूर्त स्वरुप येणार आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या लगत हिंजवडीसह सात गावांचा या महापालिकेत समाविष्ठ करायचे, तसेच म्हणजे तळेगाव दाभाडे, चाकण, देहू, आळंदी आणि राजगुरुनगरसह स्वतंत्र चौथी महापालिका करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदा मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. स्वतंत्र महापालिका करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. चार नगरपरिषदांची मिळून स्वतंत्र महापालिकेची स्थापना करावी असा अभिप्राय पिंपरी-चिंचवड महापालिकेने शासनाला दिला आहे.
तळेगाव दाभाडे, चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याबाबत मागणी होत आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरालगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करणे राज्य शासनाच्या विचाराधिन आहे. त्यामुळे राज्य शासनाने तळेगाव दाभाडे, चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशिल, तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत जिल्हा प्रशासन, महापालिकेकडून अभिप्रायासह अहवाल मागविला होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने अहवाल पाठविला आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ मोठे आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविताना महापालिकेवर ताण येत आहे. या भागातील गावे महापालिकेत समाविष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे तळेगाव दाभाडे, चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगरपरिषदांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा अभिप्राय पिंपरी महापालिकेने दिला आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही अभिप्राय पाठविला आहे.
उद्योगामुळे चाकण परिसरातील लोकसंख्या वाढत आहे. परिसर विस्तारत आहे. वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविताना तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या नगरपरिषदांवर ताण येत आहे. त्यामुळे स्वतंत्र महापालिकेची स्थापना झाल्यास या भागातील विकास कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे. रस्ते, कचरा, पाणी यासह अन्य बाबींचे नियोजन करणे सुलभ होईल, अशी धारणा प्रशासनाची आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘अर्थशास्त्री’ हरपला.. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द, मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार । Dr Manmohan Singh Passes Away
– महाराष्ट्रात शुक्रवार – शनिवार दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज ; सोमवारपासून थंडी वाढणार
– वाहनांचा अतिवेग वन्यप्राण्यांच्या जीवावर बेततोय… द्रुतगती मार्गावरील वन्यजीवांचे अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना आवश्यक