व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन । Lonavala Crime News

मावळ तालुक्यात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणूसकीला काळीमा फासणारी घटना बुधवारी (दि.२५) घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 27, 2024
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : मावळ तालुक्यात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणूसकीला काळीमा फासणारी घटना बुधवारी (दि.२५) घडली आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा गंभीर प्रकार केला आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो, ॲट्रासिटी व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्याचे निलंबनही करण्यात आले आहे.

Novel NIBR Ads

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. याकरिता पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून पोलीस ठाण्यांना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. पुणे मुख्यालयातून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बंदोबस्त कामासाठी आलेला पोलीस कर्मचारी सचिन वसंत सस्ते (वय ४३, सध्या रा. महंमदवाडी, हडपसर, पुणे. मूळ रा. जेजुरी, पुरंदर) हा बंदोबस्त कामी लोहगड विसापूर किल्ला परिसरात असताना त्याठिकाणी खेळत असलेल्या एका पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीला त्याने चॉकलेटचे आमिष दाखवत आडबाजूला घेऊन जात तिच्यासोबत दारूच्या नशेमध्ये अश्लील चाळे केले असल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.

याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने हे करत आहेत. एका खाकी वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघड झाल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला आहे. ज्याला आपण रक्षक समजतो तोच भक्षक ठरल्याने न्याय मागायचा कोणाकडे असा संताप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.पोलीस विभागाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा. विकृत मानसिकता असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘अर्थशास्त्री’ हरपला.. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द, मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार । Dr Manmohan Singh Passes Away
– महाराष्ट्रात शुक्रवार – शनिवार दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज ; सोमवारपासून थंडी वाढणार
– वाहनांचा अतिवेग वन्यप्राण्यांच्या जीवावर बेततोय… द्रुतगती मार्गावरील वन्यजीवांचे अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना आवश्यक


dainik maval jahirat

Previous Post

सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल ; दुपारी बारानंतर प्रवास करावा…

Next Post

देहू, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, तळेगाव मिळून नवीन महापालिका निर्माण करण्याच्या हालचालींना वेग । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dehu Alandi Chakan Rajgurunagar Talegaon Dabhade to form a new municipality

देहू, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, तळेगाव मिळून नवीन महापालिका निर्माण करण्याच्या हालचालींना वेग । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.