Dainik Maval News : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १९८ अन्वये नवीन दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खरेदीच्यावेळी वाहन वितरकाने दोन हेल्मेट पुरविण्याबाबत दुचाकी वाहन वितरकांना सुचना देण्यात आल्या आहेत.
ग्राहकांनी नवीन दुचाकी वाहन खरेदी करतांना वितरकांकडून हेल्मेट घ्यावेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
दुचाकीस्वारांनी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर केल्यास अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे वाहनचालक आणि सोबत बसलेल्या व्यक्तीनेही रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती भोसले यांनी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या