व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘टाटा’ने ‘मारुती’चा 40 वर्षांचा रेकॉर्ड मोडला ! टाटा पंच ठरली सर्वाधिक विक्री होणारी कार, तब्बल ‘इतक्या’ कारची विक्री

मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स हे दोन्ही भारतातील वाहन उद्योगातील टॉप ब्रँड आहेत. एकीकडे मारुतीच्या कार अधिक चांगले मायलेज देतात, तर दुसरीकडे, टाटा कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंग आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 5, 2025
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Tata Punch Breaks Maruti 40 Year Streak to Become India Number one Selling Car

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी हे दोन्ही भारतातील वाहन उद्योगातील प्रमुख ब्रँड आहेत. या ऑटोमेकर्सच्या गाड्या देशभरात सर्वाधिक विकल्या जातात. मारुती सुझुकीने वर्षानुवर्षे भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही विभागात वर्चस्व गाजवले होते. कार विक्रीच्या अहवालात मारुतीची वाहने सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असायची. आता मात्र टाटा मोटर्सच्या एसयूव्हीने मारुती सुझुकीच्या कारला मागे टाकले आहे. Autocar Pro च्या अहवालानुसार, देशातील सर्वाधिक विक्री होणारी SUV कार म्हणून टाटाची ‘पंच एसयूव्ही’ ही कार अव्वल ठरली आहे.

Novel NIBR Ads

टाटा पंचने विक्रीत मारुती वॅगनआरला मागे टाकले आहे. टाटा मोटर्सची कार देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही बनण्याची चार दशकांतील ही पहिलीच वेळ आहे. टाटा पंचची 2024 मध्ये 2.02 लाख युनिट्सची विक्री केली गेली. तर गेल्या वर्षी मारुती वॅगनआरने 1.91 लाख युनिट्सची विक्री झाली. सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा पंचने विक्रीच्या बाबतीत मारुतीच्या वॅगनआर आणि स्विफ्टला मागे टाकले आहे.

यातून आणखीन एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे, भारतीय ऑटो मार्केटमध्ये SUV ची मागणी वाढत असल्याचे दिसते. देशातील टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांमध्ये तीन SUV चा समावेश आहे. टाटा पंचाच्या आधी मारुती एर्टिगा 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV बनली होती. रिपोर्ट्सनुसार ही SUV यंदाच्या विक्री अहवालात चौथ्या स्थानावर आली आहे. याचा अर्थ आज लोक प्रीमियम वाहने आणि एसयूव्हीला अधिक पसंती देत ​​आहेत.

Novel NIBR Ads

भारतीय वाहन उद्योगाने गेल्या वर्षी (2024) विक्रमी विक्री केली आहे. 2024 मध्ये एकूण 42.86 लाख वाहनांची विक्री झाली आहे. त्याच वेळी वाहनांच्या विक्रीतील मारुती सुझुकीचा बाजार हिस्सा 2018 मध्ये 52 टक्के होता, तो 2024 मध्ये 41 टक्क्यांवर घसरला आहे. SUV बाबत लोकांच्या बदलत्या मागणीमुळे मारुतीचा बाजारातील हिस्सा कमी झाला नाही तर या ब्रँडच्या मॉडेल रँकिंगवरही परिणाम झाला आहे. दुसरीकडे टाटावर विश्वास वाढताना दिसत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी : दुचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन हेल्मेट देण्याच्या वितरकांना सूचना

Next Post

शेतकऱ्यांनी उसाचे पाचट जाळू नये, पाचट कुटी करून खत तयार करावे – कृषि अधिकारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Farmers should not burn sugarcane bagasse crush bagasse and prepare fertilizer

शेतकऱ्यांनी उसाचे पाचट जाळू नये, पाचट कुटी करून खत तयार करावे - कृषि अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.