Dainik Maval News : पाणीपुरवठा विभागातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामांना गती देणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा पदभार पाटील यांनी स्वीकारला. यावेळी ते बोलत होते.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या विभागाच्या योजना यापूर्वीही प्रभावीपणे राबविण्यात आल्या असून प्रगतीपथावरील योजनांसाठी आवश्यक निधी वितरित करण्यात येईल. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन विविध कामांना गती देणार आहे. विभागाच्या माध्यमातून पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या