व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील निर्भिड व अभ्यासू पत्रकार ‘विशाल विकारी’ यांना राज्यस्तरीय ‘पत्रकार भूषण पुरस्कार’ । Maval News

विशाल यशवंत विकारी यांना मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त 6 जानेवारी रोजी 'आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 7, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
State level Patrakar Bhushan Award to Vishal Vicari a scholarly journalist from Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा येथील मावळ ‘माझा न्युज’चे संस्थापक संपादक व लोणावळा शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विशाल यशवंत विकारी यांना मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त 6 जानेवारी रोजी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे.

एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे, अभिनेते किरण माने, दैनिक लोकमतचे सोलापूर संपादक सचिन जवळकोटे, पद्मभूषण डॉक्टर गिरीश प्रभुणे, माजी आमदार विलास लांडे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे, कामगार नेते यशवंत भोसले, इरफान भाई सय्यद, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अतुल क्षीरसागर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चपळगावकर यांच्यासह अनेक मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते.

विशाल विकारी यांनी 2003 साली साप्ताहिक इंद्रायणी वार्ताच्या माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. 2005 सालापासून दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्रातून त्यांच्या दैनिक वृत्तपत्र पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुढील काळामध्ये दैनिक लोकमतचे सलग चौदा वर्ष वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले. सोबतच दैनिक तरुण भारत, दैनिक सकाळ, दैनिक प्रभात, दैनिक भास्कर यामध्ये देखील त्यांनी काही काळ कामे केली आहेत. 2008 साली सुरू झालेल्या पहिल्या डिजिटल पोर्टल एमपीएससी न्यूजचे कामकाज त्यांनी सांभाळले. अनेक टिव्ही चॅनल मध्ये त्यांनी बातम्या दिल्या आहेत. 2019 साली कोरोना काळामध्ये सर्व जग थांबले, वृत्तपत्र बंद झाली असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी ह्या नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मावळ माझा न्युज या लोणावळा शहरातील पहिल्या डिजिटल न्युज पोर्टलची स्थापना केली. आज मावळ तालुक्यातील अग्रगण्य डिजिटल न्युज पोर्टलपैकी एक म्हणून मावळ माझा न्युजची ओळख आहे.

मागील 21 वर्ष लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये पत्रकारिता करत असताना त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, गुन्हेगारी, कला व क्रीडा या विविध विषयांवर परखडपणे लिखाण केले. अनेक निर्णय घेण्यास प्रशासनाला व राजकारणांना भाग पाडले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी सध्या ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या उपाययोजना होण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण केले. लोणावळा शहर व मावळ तालुका हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नवनवीन प्रकल्प यावेत याकरिता पाठपुरावा केला. स्थानिक नागरिकांचे प्रश्न सातत्याने मांडत प्रशासनाकडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. या आदिवासी समाजाला जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी सातत्याने लिखाण करत त्यांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मावळातील जमीन व्यवहार प्रकरणावर मालिका लिखाण केले. त्याची दखल घेत दुय्यम निबंध कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करताना आधार लिंक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लोणावळा ते तुळापूर वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची दुरावस्था ही मालिका प्रसारित करण्यामध्ये महत्त्वाचा पुढाकार घेत इंद्रायणीची झालेली अवस्था शासनासमोर मांडत इंद्रायणी नदी सुशोभीकरणाच्या कामाचा डी पी आर तयार होण्यासाठी सातत्यपूर्ण लिखाण व पाठपुरावा केला.

कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी वारंवार वार्तापत्र प्रसिद्ध केली. अशा विविध प्रकारच्या अभ्यासपूर्ण व सातत्यपूर्ण लिखाणामुळे व त्यामधून झालेल्या सकारात्मक बदलाची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्यावतीने विशाल विकारी यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या


Previous Post

ग्रामीण भागातील नळाद्वारे पाणीपुरवठा योजनांना गती देणार – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

‘राष्ट्रवादी’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Publication of NCP Calendar by Ajit Pawar Maval News

'राष्ट्रवादी' दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
Crime

गांजा विक्री प्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अटक ; नवलाख उंब्रे – बधलवाडी रोडवरील मंदिराजवळून घेतले ताब्यात

April 26, 2026
Work to remove silt from Pawana Dam begins Initiative under MP Shrirang Barne Maval

पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरू ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून सलग १० वर्षांपासून उपक्रम सुरू

April 26, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त प्रकरण कोर्टातून मंत्रालयात ! पणन मंत्री भाजपाचे असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष

April 26, 2026
Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.