Dainik Maval News : मटणाच्या दुकानातून 9 बोकड चोरणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. वराळे फाटा येथील महाराष्ट्र मटन शॉपमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मिलन सुकतार शेख (रा. वराळे फाटा ता. मावळ जि पुणे) यांनी फिर्याद दिली होती. ओमकेश लक्ष्मण मंदारपवाड (वय 21) आणि पंकज श्रावण गौड (वय 21) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 4 जानेवारी रोजी रात्री साडेदहा ते पाच जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान वराळे फाटा येथील महाराष्ट्र मटन शॉपमधील नऊ बोकड व एक गॅस सिलेंडर कोणीतरी चोरी करून नेला. याबाबत मिलन शेख यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी पथक बनवून तपास करण्याच्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती वडगाव मावळ येथे बकऱ्या विकण्यासाठी येणार आहे. त्या माहितीच्या आधारे तपास पथक वडगाव मावळ या ठिकाणी गेले असता एका दुचाकी गाडीवरून दोन जण एक बोकड घेऊन आल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, सदरचा बोकड हा वराळे फाटा येथून चोरला असल्याचे त्यांनी सांगितले. तपासामध्ये बाकीचे आठ बोकड देखील मिळाले आहेत. पुढीव तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड