Dainik Maval News : स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणारा सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी २० एप्रिल रोजी संपन्न करण्याचे निश्चित करण्यात आले असून सामुदायिक विवाह सोहळा समिती २०२५ च्या अध्यक्षपदी अजय घडवले तर कार्याध्यक्षपदी प्रवीण कुडे व कार्यक्रम प्रमुखपदी संजय दंडेल, उपाध्यक्षपदी खंडूजी काकडे, सचिवपदी विनायक लवंगारे, खजिनदारपदी अक्षय बेल्हेकर, सहखजिनदारपदी भूषण ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, समितीचे मावळते अध्यक्ष रोहिदास गराडे, ज्येष्ठ संचालक अर्जुन ढोरे, राजेंद्र वहिले, सुनील शिंदे, अरुण वाघमारे, विलास दंडेल, विवेक गुरव, सदाशिव गाडे, अनिल कोद्रे, गणेश विनोदे, शंकर ढोरे आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सामुदायिक विवाह सोहळा समितीची नूतन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. यावेळी, संस्थेचे पदाधिकारी महेश तूमकर, संतोष निघोजकर, बाळासाहेब तुमकर, गणेश ढोरे, योगेश वाघवले, अनिकेत भगत, संभाजी येळवंडे, गणेश झरेकर, सुहास विनोदे, भूषण ढोरे, दर्शन वाळुंज, उमेश दंडेल, केदार बवरे उपस्थित होते.
यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा २० एप्रिल २०२५ रोजी संपन्न होणार असून, यामध्ये सर्व जाती धर्मातील जोडप्यांचा समावेश असणार आहे. तसेच, जोडप्यांना संसारपयोगी भांडी, लग्नाचा पोशाख, साड्या, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन, नवरदेवाची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. १ एप्रिल पर्यंत जोडप्यांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत असून, नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा उपक्रम गेली अकरा वर्षांपासून राबविण्यात येत असून सुमारे १८५ जोडपी विवाहबद्ध झाले आहेत.
यावर्षी संपन्न होत असलेल्या १२ वा सामुदायिक विवाह सोहळा नावीन्यपूर्ण उपक्रमांसह साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून या उपक्रमात मावळ तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील वधू – वरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, समितीचे अध्यक्ष अजय धडवले यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड