व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News

मावळ तालुक्‍यातील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या चार पोलीस ठाण्यांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाशी जोडण्यास नागरिकांसह विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 13, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
pposition to joining Pune Rural Police Force Station in Maval Taluka with Pimpri-Chinchwad Commissionerate

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्‍यातील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या चार पोलीस ठाण्यांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाशी जोडण्यास नागरिकांसह विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. ही चारही पोलीस ठाणी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतच राहावी, अशी मागणी नागरिकांनी व अनेक राजकीय प्रतिनिधींनी केली आहे. असा कोणताही प्रस्ताव मंजूर झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील काही पोलीस ठाणी मिळून १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. त्यावेळी पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी ही महत्वाची पोलीस ठाणी यापूर्वीच आयुक्तालयाला जोडण्यात आली. यानंतर आता मावळातील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार पोलीस ठाणी आयुक्तालयाला जोडल्यास ग्रामीण पोलीस हद्दीत अवघी ३० पोलिस ठाणी राहतील.

  • मावळातील पोलीस ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ठिकाणच्या नागरिकांनी व अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याला विरोध केला आहे.

मावळातील चार पोलीस ठाणी ही ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत असून गावपण जपत ग्रामीण पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत गुन्हेगारी मोडीत काढली आहे. आयुक्तालयातील पोलीस खात्याचा कारभार मनमानी असून गुन्हेगारी वाढत चालली आहे. तळेगाव दाभाडे व देहूरोड या शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे.

ग्रामीण भागांतील नागरिकांना ग्रामीण पोलीस दलच न्याय देऊ शकते. गृह खात्याला राज्याचा कारभार आयुक्तालयातून चालवायचा असेल तर राज्यातील ग्रामीण पोलीस दल बरखास्त करा, अशी मागणी रिपब्लिक पक्षाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी केली आहे

तर, ग्रामीण पोलीस ठाणी आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. तालुक्‍यातील पोलीस ठाणी आयुक्तालयाशी जोडल्यास ग्रामीण भागाचे महत्व कमी होईल असे सांगत या प्रस्तावाला आमचा विरोध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल राऊत यांनी स्पष्ट केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात अवजड वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई, दोन दिवसांत साडेचार लाखांचा दंड वसूल । Lonavala News

Next Post

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chief Minister Devendra Fadnavis to visit Panipat to pay tribute to Maratha heroism

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.