Dainik Maval News : मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या चार पोलीस ठाण्यांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाशी जोडण्यास नागरिकांसह विविध राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. ही चारही पोलीस ठाणी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतच राहावी, अशी मागणी नागरिकांनी व अनेक राजकीय प्रतिनिधींनी केली आहे. असा कोणताही प्रस्ताव मंजूर झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील काही पोलीस ठाणी मिळून १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. त्यावेळी पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी ही महत्वाची पोलीस ठाणी यापूर्वीच आयुक्तालयाला जोडण्यात आली. यानंतर आता मावळातील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार पोलीस ठाणी आयुक्तालयाला जोडल्यास ग्रामीण पोलीस हद्दीत अवघी ३० पोलिस ठाणी राहतील.
- मावळातील पोलीस ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ठिकाणच्या नागरिकांनी व अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याला विरोध केला आहे.
मावळातील चार पोलीस ठाणी ही ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत असून गावपण जपत ग्रामीण पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत गुन्हेगारी मोडीत काढली आहे. आयुक्तालयातील पोलीस खात्याचा कारभार मनमानी असून गुन्हेगारी वाढत चालली आहे. तळेगाव दाभाडे व देहूरोड या शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे.
ग्रामीण भागांतील नागरिकांना ग्रामीण पोलीस दलच न्याय देऊ शकते. गृह खात्याला राज्याचा कारभार आयुक्तालयातून चालवायचा असेल तर राज्यातील ग्रामीण पोलीस दल बरखास्त करा, अशी मागणी रिपब्लिक पक्षाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी केली आहे
तर, ग्रामीण पोलीस ठाणी आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. तालुक्यातील पोलीस ठाणी आयुक्तालयाशी जोडल्यास ग्रामीण भागाचे महत्व कमी होईल असे सांगत या प्रस्तावाला आमचा विरोध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल राऊत यांनी स्पष्ट केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News