Dainik Maval News : ॲड. बापुसाहेब भोंडे हायस्कूल व कल्पना चावला स्पेस अकादमी, लोणावळा ह्यांच्या माध्यमातून साकार झालेल्या ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळेचे’ आमदार सुनिल शेळके यांनी अनावरण केले. ‘मला अभिमान आहे की, माझ्या मावळ मतदारसंघात असा विज्ञानवादी प्रकल्प विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राबविण्यात येत आहे.’ असे यावेळी शेळके म्हणाले.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच विविध प्रयोगांचे धडे मिळण्यासाठी, विज्ञानाबद्दल त्यांच्या मनात आवड निर्माण करण्यासाठी ही प्रयोगशाळा म्हणजे एक चांगली संधी आहे. तसेच मावळ तालुक्यातील सगळ्या शाळांसाठी हा उपक्रम उपलब्ध करण्यात आला आहे, ह्याचा मला आनंद असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
ह्या कार्यक्रमास ॲड.माधव भोंडे, राधिका भोंडे, राजूभाऊ खळदकर, आनंद नाईक, देविदास कडू, विलास बडेकर, दिपक हुलावळे, अरुण लाड, ए.के.जोशी काका, किरण गायकवाड, मंजुताई वाघ, नारायण पाळेकर, आरोही तळेगावकर, उमाताई मेहता आदी मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News