व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 15, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
NCP-Party-Flag

File Image - NCP Party


Dainik Maval News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची नियुक्ती करण्यात आली. यात आमदार सुनील शेळके यांचा समावेश असून एकप्रकारे आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे.

Novel NIBR Ads

विधानसभा निवडणुकीनंतर मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. या कोअर कमिटीत आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, नामदेव दाभाडे, दीपक हुलावळे, महादू कालेकर, नामदेव ठुले, भरत येवले, काळुराम मालपोटे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, संदीप आंद्रे, साहेबराव कारके, नारायण ठाकर, प्रवीण झेंडे, विलास बडेकर, प्रकाश हगवणे, जीवन गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाने आमदार शेळके यांना उमेदवारी दिली आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले बापूसाहेब भेगडे यांनी बंडखोरी करत निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही विभागले गेले आणि राज्यात फूट पडूनही एकसंध राहिलेल्या मावळ तालुका राष्ट्रवादीमध्ये फूट पडली.

दरम्यान निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पक्षाच्या ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांची बैठक होऊन कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. आगामी काळात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने कोअर कमिटीच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणीला सुरुवात झाली असल्याचे दिसते. आगामी सर्व निवडणुका व पक्ष संघटना बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णयासाठी ही कमिटी मार्गदर्शन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’


dainik maval jahirat

Previous Post

ओझर्डे गावातील दोन वर्षाच्या रायाजीने सर केला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर । Maval News

Next Post

लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, अपहरणकर्त्याला पालकांनी दिला चोप । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

लोणावळ्यात दोन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न, अपहरणकर्त्याला पालकांनी दिला चोप । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.