व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ । Pune Ring Road

मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले व शेतकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये तहसील कार्यालय वडगांव मावळ येथे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 15, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Pune Ring Road affected farmers of Maval taluka meeting in presence of MLA Sunil Shelke Surendra Navale

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील रिंग रोड (Pune Ring Road) बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले व शेतकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये तहसील कार्यालय वडगांव मावळ (Vadgaon Maval) येथे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ७४ शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या असून त्यापैकी बहुतांशी निकाल तात्काळ देण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना येत्या ८ दिवसात निकाल देण्यात येईल.

मावळ तालुक्यातून जात असलेल्या रिंगरोड मुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून बहुतांश शेतकऱ्यांना रिंगरोडचा मोबदला भेटला असून अनेक गावामध्ये शेतकऱ्यांमध्ये आपआपसात मतभेद असल्याने अद्याप मोबदला मिळाला नाही. मोबदला देण्याचा अवधी उलटून गेल्याने अनेक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के कपात करून मोबदला देण्यात येणार होता. ही बाब मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शेतकरी आणि प्रांत अधिकारी यांची बैठक बोलावून शेतकरी यांचा तक्रारी जाणून घेतल्या व शेतकरी यांना आपले नुकसान होऊ नये म्हणून आपापसातील वाद मिटवण्याची सूचना करून प्रांत अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी आठ दिवसाची मुदतवाढ करून घेतली.

ज्या गावांमध्ये सक्तीचे भूसंपादन राबविण्यात आले त्यामध्ये आता काही बदल करता येणार नसून वडगाव, कातवी, आंबी, सुदुंबरे, सुदवडी आणि इंदोरी या गावांमध्ये सक्तीचे भूसंपादन सुरू झालेले नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी येत्या ८ दिवसात आपले नुकसान टाळण्यासाठी कौटुंबिक वाद हा सामंजस्याने मिटविण्याबाबत आवाहन करण्यात आले.

ज्या शेतकऱ्यांचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत, त्या बाबत आज निर्णय घेण्यात आलेला नसून त्यासाठी पुढील 8 दिवसांचा कालावधी वाढवून मिळण्याबाबत प्रशासनास यावेळी विनंती करण्यात आली. तसेच वडगाव व नानोली भागातील कातकरी बांधवांची घरे रिंग रोड मध्ये बाधित झाली असून त्यांनाही त्याबदल्यात मोबदला देण्याबाबत सूचना यावेळी करण्यात आल्या.

ह्या बैठकीस प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, उप-अभियंता सार्वजनिक बांधकाम धनराज दराडे, भूमि अभिलेख उपअधीक्षक पल्लवी पिंगळे, उप-अभियंता एम.आय.डी.सी. विठ्ठल राठोड उपस्थित होते.

रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले. शेतकऱ्यांचे कोणताही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ नये त्यांच्यावर अन्याय होऊ नये हा यामागील मुख्य उद्देश होता. या बैठकीत आठ दिवसाची मुदत वाढ देण्यात आली असून शेतकऱ्यांनी सक्तीची जमीन अधिग्रहण होणार नाही. आपले नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आमदार सुनील शेळके म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आंदर मावळातील बेलज – राजपुरी रस्त्याची प्रचंड दुरावस्था ! पर्यटन व्यवसायावर होतोय परिणाम । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’
– मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटकडून आरोग्य शिबिराचे आयोजन

Next Post

लोणारी समाज सेवा संघातर्फे श्रीक्षेत्र देहू येथे कै. विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी यांची 92वी जयंती उत्साहात साजरी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonari Samaj Seva Sangh celebrated birth anniversary of Vishnupant Ramchandra Dadre Lonari at Dehu

लोणारी समाज सेवा संघातर्फे श्रीक्षेत्र देहू येथे कै. विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी यांची 92वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.