Dainik Maval News : लोहगड किल्ल्यावर शिवप्रेमी आणि गडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. लोहगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ठ व्हावा यासाठी नामांकन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने गडावर विविध कामे होत असून काही पूर्णत्वास गेली आहेत.
असे असले तरीही पर्यटक व शिवप्रेमींसाठी अनेक गोष्टी करणे बाकी आहे. त्यात पिण्याचे पाणी मिळणे, महत्त्वाचा भाग आहे. गडावर पिण्याचे पाणी नसल्यामुळे शिवप्रेमी व पर्यटकांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखविली होती. लोहगड विसापूर विकास मंच यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला. यानंतर पुरातत्व विभागाने सकारात्मक भूमिका घेऊन लोहगड पायथ्याला पुरातत्व विभागाला साजेसे असे ऐतिहासिक पद्धतीने दगडामध्ये सुंदर अशी पाणपोई बांधली आहे.
त्यासाठी पुरातत्व अधिकारी गजानन मांढवरे यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली. तसेच पाणपोईला जी पाण्याची टाकी जोडली आहे. त्या टाकीला लोहगड ग्रामपंचायतने पाणी पुरवले आहे. लोहगड गावाला पवनेचे पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांनी त्यांना मिळणाऱ्या पाण्यातून पर्यटकांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली व चांगल्या सहकाराची भावना दाखविली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News