Dainik Maval News : माझी वसुंधरा अभियान 5.0 वायू 2.6 या घटकांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात आले.
नगरपरिषद हद्दीतील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना आपत्ती काळात जलद व प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात पाणी आपत्ती बचाव व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे तंत्र, तसेच स्थानिक यंत्रणांशी समन्वय कसा साधावा यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
- प्रशिक्षणादरम्यान स्टेशन तलावामध्ये बोटीच्या सहाय्याने प्रत्यक्ष बचावकार्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन वायू या घटकाच्या प्रमुख मोनिका झरेकर, मिळकत व्यवस्थापक मधुरा जोशी आणि रणजित सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे व त्यांची टीम, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन विभाग कर्मचारी, इतर अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन