Dainik Maval News : रस्ते अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे यांनी लोणावळ्यात नागरिकांना केले. नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी लोणावळा शहरामध्ये पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय लोणावळा शहर पोलीस वाहतूक शाखा व लोणावळा शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
मोटार वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे व प्रदीप पाटील लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह पोलीस कर्मचारी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे मालक, संचालक रिक्षा चालक टॅक्सी चालक यांनी या जनजागृती रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.
दाभाडे मंगल कार्यालय या ठिकाणाहून सदर रॅलीला सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, मावळा पुतळा चौक, गवळीवाडा येथील भगवान महावीर चौक, गवळीवाडा, नारायणी धाम, तुंगार्ली गाव येथून सदर रॅली नेण्यात आली. तुंगार्ली येथील लोणावळा नगरपरिषद शाळा पटांगण येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
याठिकाणी उपस्थित वाहन चालकांना पिंपरी चिंचवड प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने वाहतूक नियमांबाबत माहिती देण्यात आली. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, अवजड वाहने डाव्या बाजूने चालवावीत, दुचाकी चालवताना हेल्मेट चा वापर करावा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या सूचना फलकांचे पालन करावे अशा विविध प्रकारच्या सूचना यावेळी देत नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत बाबत जनजागृती करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City