व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे : डॉ. सुरेशकुमार मेकला

महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी संयुक्त प्रयत्न करायला हवेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 1, 2025
in महाराष्ट्र, मावळकट्टा
It is necessary to strictly follow the rules for safe travel said Dr Suresh Kumar Mekla

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी संयुक्त प्रयत्न करायला हवेत. आपल्या मागे परिवार आहे ही भावना सतत मनात असायला हवी. वाहन चालवताना शॉर्टकटचा वापर आणि नियम भंग झाल्यास स्वतः सोबत इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. युवा पिढीनेही महामार्गावरील सुरक्षा या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पुस्तकी शिक्षणापेक्षा महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी तारतम्य बुध्दीचा वापर व्हायला हवा किंबहूना रस्ते सुरक्षा अभियान हे जानेवारी महिन्या पुरते मर्यादित न रहाता वर्षाचे बारा महिने राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. सुरेश कुमार मेकला – अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांनी केले.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पळस्पे केंद्रात, पोलीस अधिक्षक – महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र, यांच्या वतीने रस्ते सुरक्षा अभियान २०२५ च्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दिनांक ३१ जाने २०२५ रोजी रस्ते सुरक्षा अभियान – २०२५ च्या समारोपाच्या कार्यक्रमात महामार्गावरील अपघात टाळण्यासठी आणि तत्परतेने पोलीस यंत्रणेला अपघात प्रसंगी स्वयंस्पूर्तीने मदत करणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामजिक संस्था, मृत्युंजय देवदूत, आय आर बी पेट्रोलिंग टीम, डेल्टा फोर्सचे जवान, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पीटलचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार आणि सामजिक कार्यकर्ते यांचा सत्कार डॉ.सुरेश कुमार मेकला यांच्या हस्ते करण्यात आला.

  • अपघातात कशा प्रकारे मदत करता येऊ शकते याबाबत हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी माहिती दिली तर सारथी सुरक्षा सेवा संस्थेचे अध्यक्ष विनय मोरे यांनी उपस्थितांना प्रवास करतांना सिग्नलची उपयुक्तता तसेच सुरक्षित प्रवासासाठी महत्वाच्या टिप्स दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक तानाजी चिखले – पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगड यांनी, तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना रासम – उपविभागीय पोलिस अधिकारी रायगड यांनी केले.

रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत निबंध , वकृत्व आणि चित्रकला स्पर्धेत गुणांकन प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. महामार्ग वाहतूक पोलीस विभागासाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धातील विजेत्या बोरघाट आणि पळस्पे केंद्राच्या टीमचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विक्रम कदम – उपविभागीय पोलिस अधिकारी खालापूर, पोलीस निरीक्षक विनोद माळवे, प्रभारी अधिकारी वैभव रोंगे, आर टी ओ विभागाचे जय शेठे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जीबीएस’चा पहिला बळी, पिंपळे गुरव येथील ओला-उबेर चालकाचा मृत्यू । Pimpri-Chinchwad

Next Post

लोणावळ्यात वाहतूक नियमांच्या माहितीसाठी जनजागृती रॅली । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Public awareness rally for information about traffic rules in Lonavala

लोणावळ्यात वाहतूक नियमांच्या माहितीसाठी जनजागृती रॅली । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.