Dainik Maval News : शौचालयाचे बांधकाम इतरांना दिल्याच्या रागातून एका मजुराला चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.29) सायंकाळी साडेसात वाजता ठाकरवस्ती, सोमाटणे येथे घडली.
नवनाथ बबन जाधव (वय 29, रा. सोमाटणे) यांनी गुरुवारी (दि.30) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मलकेश रुद्रप्पा भोईर (वय 47), जितेंद्र मलकेश भोईर (वय 27, रा. सोमाटणे), एक महिला आणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सर्वजण बांधकाम साईटवर मजुरी काम करतात. नवनाथ यांच्याकडे आलेले शौचालयाचे काम त्यांनी इतरांना दिले. या रागातून आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, बेल्ट, दगड आणि विटांनी बेदम मारहाण केली.
हल्ल्यात नवनाथ यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City