व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘लग्न जमविताना दोन मने, परंपरा जपण्यासाठी मानपान बाजूला ठेवणे काळाची गरज’ । Maval News

समुपदेशक विद्या जोशी यांचे प्रतिपादन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 3, 2025
in लोकल, शहर
Organized gathering for youth of Maratha community on behalf of Jodi Jamwa Mandal at Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विवाह ठरविताना मानपानासाठी हट्ट न करता स्नेह वाढविणे गरजेचे आहे. दोन कुटुंबे, दोन मने आणि परंपरा जपण्यासाठी मानपान बाजूला ठेवणे, ही काळाची गरज आहे. आताच्या पिढीचे विचार प्रॅक्टिकल आहेत. तरुणीही बिनधास्तपणे नोकरी करतात. त्यामुळे विवाहानंतर या तरुणींना समजून घेऊन त्यांच्या पंखाना बळ देण्याची भूमिका कुटुंबाने घेतली पाहिजे, असे आवाहन समुपदेशक विद्या जोशी यांनी विवाहेच्छुक तरुण – तरुणींच्या पालकांना केले.

Novel NIBR Ads

  • तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात जोडी जमवा मंडळाच्या वतीने मराठा समाजातील विवाहेच्छुक तरुण – तरुणींसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात दीडशेहून अधिक वधू – वरांनी सहभाग नोंदवला. त्यांना मार्गदर्शन करताना समुपदेशक विद्या जोशी बोलत होत्या. यावेळी योगेश्वर माडगूळकर, अनिल टकले, अनिल खुळे, आयोजक मनिषा सांडभोर, मंगेश सांडभोर, तुषार क्षीरसागर, राजेंद्र मिरगे, राजेश सरोदे, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्या जोशी म्हणाल्या की, आज मराठा समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहे. या समाजातील अनेक मुले-मुली उच्च शिक्षित आहेत. अलीकडे एकत्र कुटुंब पद्धती जास्त राहिली नसल्यामुळे मुला-मुलींची लग्न जमविताना अडचणी येत आहेत. त्यासाठी आज वधू-वर सूचक मंडळाची नितांत आवश्यकता असून, ही काळाची गरज आहे.

अनिल टकले म्हणाले, व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे व शिक्षणानिमित्त समाज विखुरला गेलेला आहे. त्यामुळे लग्न जमविताना मोठ्या अडचणी येतात. समाजाला एका छताखाली आणून त्यांना वधू-वर यांच्या मुलाखतीद्वारे समक्ष पाहण्यासाठी अशा मेळाव्यातून साध्य होत आहे.

मंगेश सांडभोर म्हणाले, की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने सामाजिक भावनेतून मराठा तरुण तरुणीचे लग्न जमविण्याचे व्रत हाती घेतले आहे. भविष्यात याला भव्य स्वरूप द्यायचे आहे. सूत्रसंचालन व आभार मनीषा सांडभोर यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला । Lonavala News

Next Post

आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Majhi Ladki Bahin scheme

आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme Details borrowers uploaded by PDCC

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ : ‘पीडीसीसी’कडून १.०८ लाख कर्जदारांचा तपशील अपलोड

July 1, 2026
High-level inspection of Dehu-Alandi Palkhi route ahead of Ashadhi Wari 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी

July 1, 2026
Ketan Agrawal Murder Case Police custody of Siya Goyal Chetan Chaudhary extended until July 3

केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

July 1, 2026
Farmers rise up again against Pavana closed-conduit pipeline project protest on Wednesday

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन

July 1, 2026
Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.