व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 5, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana

अर्जांची पडताळणी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक महिलांच्या मनात धास्ती असून आत्तापर्यंत राज्यातील हजारो महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 4, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Majhi Ladki Bahin scheme

Photo Courtesy : CMO


Dainik Maval News : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक महिलांच्या मनात धास्ती असून आत्तापर्यंत राज्यातील हजारो महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत शासनाने पात्र महिलांना दीड हजार रुपये महिना खात्यात टाकण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण राज्यात या योजनेच्या जवळपास 2 कोटी 30 लाख महिला पात्र लाभार्थी आहेत. मात्र, यापैकी बऱ्याच पात्र महिला या सधन कुटुंबातील असूनही त्यांनी योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची शासनाने पडताळणी सुरु केली आहे. शासनाच्या या निर्णयाची लाभार्थी महिलांना आता धास्ती वाटू लागली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको असा सांगणारा अर्ज सादर केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकार
चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याचे समोर आल्यानंतर अर्ज पडताळणीच्या धास्तीने चंद्रपूरमधील महिलांनीच हे पैसे नाकारण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 21 बहिणींनी योजनेचा लाभ नको असे सांगत जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज केला आहे. हे अर्ज मंत्रालयात डीबीटी बंद करण्यासाठी पाठविले आहेत.

राज्यातही हजारो महिलांची माघार
‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून काही निकष जाहीर करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र, आता पडताळणी होण्याआधीच हजारो महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या अर्जांची पडताळणी होण्याआधीच राज्यातील सुमारे 4 हजार महिलांनी आपला अर्ज या योजनेतून मागे घेतला असल्याचे समजते.

गुन्हा दाखल होण्याची भीती
पैसे परत करावे लागतील, या भीतीने हजारो लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी केलेले अर्ज मागे घेण्यास सुरूवात केली आहे. चंद्रपूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातूनही महिलांनी असे अर्ज केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महिलांनी जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे हे अर्ज केले आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


dainik maval ads may 2025

Previous Post

‘लग्न जमविताना दोन मने, परंपरा जपण्यासाठी मानपान बाजूला ठेवणे काळाची गरज’ । Maval News

Next Post

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद ; २०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Indian-Railway

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद ; २०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval-Taluka

पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा । Pawana Dam Updates

July 5, 2025
Maval Bhushan MLA Late Krishnarao Bhegde condolence meeting

मावळभूषण आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन

July 5, 2025
Devshayani-Ashadhi-Ekadashi

आषाढी एकादशीनिमित्त रविवारी वडगाव शहरातील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Vadgaon Maval

July 5, 2025
Wildlife conservationist Maval organization saves injured monkey from Jambhul Phata Maval

जांभूळ फाटा येथे जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून जीवदान । Maval News

July 4, 2025
Big News Conspiracy to murder MLA Sunil Shelke exposed SIT formed

खळबळजनक! आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट, चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना, गृह राज्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

July 4, 2025
High Security Registration Number Plate

महत्वाची बातमी ! जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्यासाठी १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत

July 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.