Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मळवंडी ठुले येथील ऊस उत्पादक शेतकरी सुरेश चिंचवडे यांच्या शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारित ऊस शेतीचे प्रात्यक्षिक राबविण्यात आले. यासाठी शरदचंद्र पवार अत्याधुनिक ऊस शेती विस्तार प्रकल्पातील तज्ञ अधिकाऱ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कमी खर्चात ऊस लागवड व उत्पादन वाढ संदर्भाने उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
- कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाने प्रथमच मावळ तालुक्यात ऊस लागवड करण्यास शनिवारी (दि.8) सुरुवात झाली. उपस्थितांच्या माहितीप्रमाणे, फक्त तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारी ही पहिली सुरुवात ठरणार आहे.
प्रगतिशील शेतकरी सुरेश चिंचवडे यांच्या बारमाही उत्पादन असलेल्या दोन एकर ऊस शेतीमध्ये नुकतेच त्यांनी एआय तंत्रज्ञानाची उभारणी पूर्ण केली आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे एआय तंत्रज्ञान विभाग प्रमुख तुषार जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
याप्रसंगी श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, रविंद्र भेगडे, इतर मान्यवर व पवनानगर भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News