Dainik Maval News : श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर उभ्या राहत असलेल्या भव्य-दिव्य मंदिरासाठी आपल्या सर्वांचा सहभाग आहे, हे खरोखरच भाग्य आहे. पुढील वर्षी 2026 ला होणाऱ्या माघ शुद्ध दशमी सोहळ्यापर्यंत मंदिरात श्री विठ्ठल-रखुमाई व जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकोबारायांची प्राणप्रतिष्ठा झालेली असेल असा आपण सर्वांनीच निश्चय करू. तसेच नियोजित कॉरिडॉर व डोंगरावरील रस्ता या सर्व कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे आपण सर्वजण एकत्रितपणे पाठपुरावा करू व कॉरिडॉरच्या कामासाठी शासनाकडून सुमारे 1000 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.
श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू व आळंदी यांचा सर्वप्रथम विकास आराखडा होत असताना अजित पवार व तत्कालीन अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील व यांच्याकडे पाठपुरावा करून श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचा देखील या विकास आराखड्यात समावेश करण्यात आला. त्या सर्व क्षेत्रांच्या विकास आराखड्यासाठी त्यावेळी 400 कोटी रुपये प्रथम मंजूर करण्यात आले. आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या कॉरिडॉर प्रकल्पाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन हे काम मार्गी लावावे असे मत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
- श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व माघ शुद्ध दशमी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व किर्तन महोत्सवाच्या’ निमित्ताने आयोजित कीर्तन सोहळ्याला आमदार शेळके व मान्यवर उपस्थित होते. यावेळी हभप माऊली कदम (छोटे माऊली) यांची कीर्तन सेवा झाली.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या-त्या क्षेत्राचा संपूर्ण कायापालट होतो तसाच कायापालट श्रीक्षेत्र देहू, आळंदी व भंडारा डोंगराचा आमदार शेळके यांनी करावा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र शेळके यांना डोक्यावर घेऊन नाचल्या शिवाय राहणार नाही असे मत विलास लांडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी खेडचे आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघिरे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी नगरसेवक नाना काटे, कात्रज दूध डेअरीचे माजी चेअरमन बाळासाहेब नेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
- मंदिर निर्माणाच्या पवित्र कार्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, त्यांचे बंधू विश्वनाथ लांडे, भगिनी मुंगसे, गोडसे व गुजर परिवारांकडून 1 कोटी रुपयाचा निधी आमदार सुनील शेळके व बाबाजी काळे यांच्या शुभहस्ते ट्रस्टकडे सुपूर्त करण्यात आला.
वारकरी संप्रदायाचे व महाराष्ट्राचे वैभव, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पवित्र अशा श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखिल वारकरी संप्रदायाला व महाराष्ट्राला भूषणावह ठरणारे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाच्या कार्यास सर्व वारकरी भाविक, दानशूर दाते जे सहकार्य करीत आहेत त्या सर्वांचेच आमदार सुनील शेळके यांनी ऋण व्यक्त केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ