Dainik Maval News : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा सेवकांच्या समवेत दिनांक २५ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान सामुहिक आमरण उपोषण केले होते. त्यांच्या समवेत मावळ तालुक्यातील भाऊसाहेब हुलावळे, नरेंद्र मुऱ्हे, पुणे शहरातील अनिकेत देशमाने यांनी आमरण उपोषण करुन जरांगे पाटील व मराठा समाजाप्रति कर्तव्य भावना दाखवली होती.
त्यांच्या समाजाप्रति कर्तव्य भावने बदल सकल मराठा समाज मावळ यांच्या वतीने या तीनही उपोषणकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठा समन्वयक संदीप तिकोणे, कैलास पडवळ, तानाजी भानुसघरे, सचिन भानुसघरे, विशाल मुऱ्हे, संजय कचरे, सहादु बढेकर, विनोद हुलावळे, कैलास येवले, विलास येवले, विकास घाटुले,सु नील वाजे, दत्तात्रय ढाकोळ, बापु गराडे, मारुती आडकर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ