Dainik Maval News : शिवली येथील एक पंचवीस वर्षीय युवक बेपत्ता असल्याची तक्रार वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दत्तात्रय संभाजी आडकर (वय 25 वर्षे, रा.शिवली ता.मावळ जि.पुणे) असे बेपत्ता असलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजलेपासून सदर तरूण राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला आहे. याप्रकरणी 3 फेब्रुवारी रोजी मिसिंग दाखल कऱण्यात आली आहे. पोलीस युवकाचा शोध घेत असून सदर मुलगा मिळून आल्यास वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसानी केले आहे.
बेपत्ता युवकाचे वर्णन –
उंची 5 फुट 7 इंच, चेहरा-उभा, रंग-सावळा, नाक- सरळ, अंगाने सडपातळ, उजव्या हाताचे अंगठ्यावर टाके टाकलेले व्रण, अंगात चाॅकलेटी रंगाचा हाफ टि शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात चप्पल नाही. डोकीस काळे केस बारीक, भाषा मराठी, हिंदी बोलतो, शिक्षण 10 वी.
युवकाची माहिती मिळाल्यास संपर्क साधावा –
1) वडगाव मावळ पोलीस स्टेशन – 02114 235333
2) पोलीस निरीक्षक कुमार कदम – 9011079622
3) पोलीस हवालदार काळे – 9823145155
4) पो.काॅ. भोईर – 8766887512
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त